पठ्ठ्याने आयपीएलमध्ये 9 वेळा संघ बदलले, 1 ट्रॉफी जिंकताना नाकी नऊ, बहाद्दराच्या कामगिरीने आख्खी ऑस्ट्रेलिया 'फिदा'

IPL : ऑस्ट्रेलियाच्या पठ्ठ्याने आयपीएलमध्ये 9 वेळा संघ बदलले, 2 हजार धावा काढल्या, 5 विकेट्सही पटकावल्या

Aaron Finch

1/9
IPL : इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात झालीये. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर मोठे बदल पाहायला मिळत आहेत. जे खेळाडू अनेक वर्ष सोबत खेळले तेच आता एकमेकांविरोधात खेळताना दिसत आहेत. आयपीएलच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत. जे एकाच टीममकडून खेळले आहेत. मात्र, आयपीएलमध्ये असाही खेळाडू ज्याने 9 वेळा संघ बदलला किंवा 9 संघांकडून खेळला आहे, असं म्हणता येईल. 5 पेक्षा जास्त वेळा संघ बदलणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात...
2/9
आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांचे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ॲरॉन फिंच याच्या नावावर आहे. फिंच त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 9 फ्रँचायझींसाठी खेळला. त्याने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला. तो 2022 मध्ये ॲलेक्स हेल्सच्या जागी केकेआरमध्ये सामील झाला. यासोबतच त्याने सर्वाधिक फ्रँचायझींचा भाग असलेल्या खेळाडूचा विक्रमही केला. फिंचने आयपीएलमध्ये 10 हंगाम खेळले आणि 2005 धावा केल्या.
3/9
या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट दुसऱ्या स्थानावर आहे. तो 8 आयपीएल संघांसाठी खेळला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादचा या संघांसाठी तो खेळला आहे. उनाडकट हा भारतीय क्रिकेटपटू देखील आहे, जो सर्वाधिक संघांसाठी खेळला आहे.
4/9
भारतीय फलंदाज मनीष पांडे यानेही 7 आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून झाली. नंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले.
5/9
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही आयपीएलमध्ये 6 संघ बदलले आहेत. गेल्या वर्षी निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी, तो दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला.
6/9
भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोन हा देखील 6 संघांसाठी खेळला आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व केले आहे.
7/9
भारताचा लेगस्पिनर मुरुगन अश्विननेही कॅश रिच लीगमध्ये 6 संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया, दिल्ली डेअरडेव्हिल्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर अशा एकूण 6 फ्रँचायझींसाठी खेळला.
8/9
भारताचा उजवा हात वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 6 फ्रँचायझींसाठी खेळला आहे. इशांतने कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाचे प्रतिनिधित्व केले.
9/9
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही आपल्या आयपीएल कारकिर्दीत 6 संघ बदलले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर युवराज सिंग आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला.
Sponsored Links by Taboola