Photo : विठुरायाची सुवर्ण दिवाळी, अनमोल दागिन्यातील देवाचे लोभस रूप
दिपवाळीनिमित्त रोज विठुराया, रुक्मिणी माता, महालक्ष्मी माता आणि व्यंकटेशाला ठेवणीतल्या पारंपरिक हिरेजडित दागिन्यात मढवण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीसाठी प्रत्येकजण ठेवणीतल्या आणि नवीन कपड्यात सजत असतो. अगदी तसंच आपल्या लाडक्या विठुरायालाही दिवाळीसाठी अनमोल मौल्यवान दागिन्यात सजवण्यात येत असतं.
आज सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विठुरायाला हिरेजडित मुकूट, कानात सुवर्ण मत्स्यजोड, कापली हिऱ्यांचा नाम, कंठी मौल्यवान कौस्तुभ मणी अशा दागिण्यांनी सजवण्यात आलं होतं.
तसेच दंडाला हिऱ्यांच्या दंडपेट्या, मनगटी हिऱ्याचे कंगन जोड, गळ्यात नावरत्नांचा हार, हिऱ्यांचा लफ्फा, पानाड्याचा सुवर्ण हार असे दागिणेही त्याच्या अंगावर होते.
विठुरायाला मोर मंडळी, सोन्याच्या बोरमाळा आणि तुळशीमाळा, सुवर्ण पुतळ्यांच्या माळा आणि पायात हिऱ्यांचे पैंजण अशा अनोख्या दागिन्याने सजवण्यात आलं आहे.
विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही सुवर्ण मुकुट, जडावाचे हार, नवरत्नांचा हार, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी, तन्मणी आणि हिऱ्या माणक्यांच्या विविध प्रकारचे हार परिधान करण्यात आले आहेत.
खास दिवाळीचा पोशाख करताना विठुरायाला 19 तर रुक्मिणी मातेला 23 प्रकारच्या मौल्यवान दागिन्यात मढविण्यात आले आहे .
देशभर दिवाळीची धूम जोरात सुरु असताना अवघ्या विश्वाचे आराध्य असणाऱ्या विठूरायाची पंढरपूर देखील आकर्षक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालं आहे.
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असल्याने, घरोघरी दिव्यांची आरास होत असताना चंद्रभागेच्या उजळवून टाकण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वारकरी आणि पंढरपूरकर घाटांवर दिव्यांची आरास करत असतात .
दिवाळीच्या सणाला देवाचे दर्शन घडावे यासाठी देशभरातून रोज हजारो विठ्ठलभक्त मंदिरात येत आहेत.