PHOTO: पंढरपुरातील द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा तडाखा
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात 11 हजार एकरावरील द्राक्ष बागांना (Grapes Farming) अवकाळीचा फटका बसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागांना दणका बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
आज पहाटे पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे.
तर, तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत संकटात सापडत असून, त्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात 23 मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर पटवर्धन कुरोली येथे 20 आणि चले भागात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे.
शिवाय भुरी, दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, पंढरपूर तालुक्यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. पण, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून, सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.