Ajit Pawar: 'उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद', अजित दादांच्या मातोश्री विठुरायाच्या दर्शनाला
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवत राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सामील झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री थेट पंढरपूरला पोहचल्या आहेत.
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या आहेत.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात अजित पवारांनी परिवारासह सेवा केल्याने फळ मिळाल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आशाताई पवार दर्शनासाठी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्या.
राजकारणात पवार नाव घेताच आपल्यासमोर राजकारण उभं राहतं.मात्र अजित पवारांच्या आई कायम राजकारणापासून दूर आहेत.
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी झाला.
अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत.
अजित पवारांचे त्यांचे वडील व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करायचे.