Year Ender 2024 : रोहित-कोहली यांच्यासोबतच 'या' खेळाडूंच्या घरी यावर्षी पाळणा हलला, जाणून घ्या कोण कोण झालं बाबा?
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने फेब्रुवारीमध्ये मुलाला जन्म दिला. दोघांनीही आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव अकाय ठेवले. किंग कोहलीने त्याच्या इन्स्टा हँडलवरून ही माहिती दिली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसनही यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा बाबा झाला. त्याची पत्नी सारा रहीम हिने एका मुलीला जन्म दिला. दोघेही तिसऱ्यांदा पालक झाले.
पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीसोबत लग्न केले. या वर्षी ऑगस्टमध्ये दोघेही एका आईवडिल झाले. शाहिदने आपल्या मुलाचे नाव अली यार ठेवले आहे.
भारतीय फलंदाज सरफराज खान ऑक्टोबरमध्ये वडील झाला. त्यांची पत्नी रोमना जहूर हिने एका मुलाला जन्म दिला.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ट्रॅव्हिस हेडही याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या मुलाचा बाप झाला आहे. त्याची पत्नी जेस हिने एका मुलाला जन्म दिला. हेडच्या दुसऱ्या मुलाचे नाव हॅरिसन जॉर्ज हेड आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माही नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी रितिका सजदेहने मुलाला जन्म दिला. रोहित आणि रितिका यांना समायरा नावाची एक मुलगी देखील आहे.