सोलापुरातील मंद्रूपच्या शेतकऱ्यांचा 'बैलगाडी मोर्चा' मुंबईच्या दिशेनं
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप (Mandrup) येथील शेतकऱ्यांचा मुंबईच्या (Mumbai) दिशेने बैलगाडी मोर्चा (Bullock cart march) निघाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी मंद्रूप येथील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
सोलापूर शहरात मुक्काम करुन उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचं हत्यार उपसले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मंद्रूप येथील या शेतकऱ्यांनी 174 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारनं त्यांना आश्वासन दिले होते.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी देखील अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील अद्याप या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा उतरलेला नाही.
शेतकऱ्यांनी आर या पारची भूमिका घेत मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास सुरु केला आहे. दरम्यान, आज हे शेतकरी सोलापुरात मुक्काम करुन उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
सोलापूर ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी निघाले आहेत. आमची बागायती शेती सोडून तुम्हाला कुठे MIDC करायची ते करा अशी मुख्यमंत्र्यांनी विनंती असल्याचे शेतकरी म्हणाले.
सातबाऱ्यावर असणारा MIDC चा शेरा जोपर्यंत काढणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहू अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
आमच्या जमिनीवर MIDC चा शेरा दिल्यामुळं आम्हाला कर्ज मिळत नाही. त्यामुळं कशी शेती करायची. या सर्वांमुळं शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.