संपाचा फटका! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द, पाहा फोटो
संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी महिला रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत आहे. ज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
तर याचा सर्वाधिक परिणाम सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयात अतिशय बिकट अवस्था आहे.
त्यामुळे केस पेपर काढण्यापासून ते प्राथमिक तपासणी आणि शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात पहिल्याच दिवशी नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढावे लागत आहे.
तर घाटी रुग्णालयातील सुरक्षारक्षक रुग्णांच्या नातवाईकांना स्वतः स्ट्रेचर ओढण्यासाठी मदत करत होते.
दरम्यान संप कधी सुटणार आणि आरोग्य सेवा पुन्हा कधी सुरळीत होणार याबाबत रुग्ण चौकशी करताना पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे गंभीर रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल होत असून, यासाठी नातवाईकांना मोठी कसरत करावा लागणार आहे.