Chhatrapati Shivaji Maharaj : मॉरिशसमध्ये शिवरायांच्या भव्य पुतळा, लोकार्पण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस रवाना
मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला असून आज (28 एप्रिल) त्याचं लोकार्पण होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे.
यासाठी देवेंद्र फडणवीस मॉरिशसला रवाना झाले आहेत. संध्याकाळी लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडेल.
परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यात आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मॉरिशसमधील शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाबाबत परराष्ट्रमंत्री ए.के. गोनू यांनी 8 मार्च 2023 रोजी फडणवीस यांची भेट घेतली होती.
दरम्यान मॉरिशसमध्ये 75 हजारांहून अधिक मराठी लोक राहतात. यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकणातील नागरिकांचा समावेश आहे.
मॉरिशस दौऱ्यात देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रुपन यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ते 29 किंवा 30 एप्रिल रोजी रात्री उशिरा भारतात परततील.