Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan Fishing : शेपटी विषारी, पण मासा चविष्ट... मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच वागळी मासा सापडल्याने मच्छिमारांच्या आनंदावर विरजण
राज्यात गेले दोन महिने पावसाळ्यात मासेमारी पूर्णपणे बंद होती. दोन महिन्यानंतर कालपासून तब्बल 61 दिवसांनी मासेमारी हंगाम सुरु झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र कोकणात मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांवर संकट ओढवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करुन आलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात विषारी मासे सापडल्याने मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गेले दोन महिने रोजगाराची संधी नसल्याने घरी बसून असलेले मच्छिमार आता मासेमारी हंगाम सुरु झाल्याने आनंदात होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
स्थानिक भाषेत वागळी नावाने प्रचलित असलेल्या माशाची शेपटी अत्यंत विषारी असते. शेपटी विषारी पण मासा चविष्ट म्हणून वागळी मासा ओळखला जातो.
या माशाने जर शेपटीने हल्ला केला तर याचं विष माणसाच्या अंगात गेल्यास माणूस गंभीर आजारी पडू शकतो. रुग्णालयात उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही.
हा मासा खाण्यासाठी चांगला असला तरी या माशांची शेपटी ही विषारी असल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे.
या माशांची शेपटी तोडून हे मच्छिमार वाळूत पुरुन टाकता. त्यानंतर हा मासा विक्रीसाठी पाठवला जातो.
मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच वागळी मासा मिळाल्याने मच्छिमार नाराज आणि संभ्रमावस्थेत आहेत.