Rain Update: राज्यातील 'या' 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या विभागातील पावसाची स्थिती
राज्यात मागील तीन-चार दिवस पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला होता, पण आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसू शकतो.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, येथे आज तुरळक पाऊस हजेरी लावेल.
त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.