Sindhudurg Phondaghat : धुक्यामुळे फोंडाघाटाचे सौंदर्य अधिकच बहरले
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
27 Aug 2023 09:59 AM (IST)
1
पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणाऱ्या फोंडाघाटात धुक्याची चादर पसरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
धुक्यामुळे फोंडाघाटाचे सौंदर्य अधिकच बहरुन गेलं आहे.
3
कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असणाऱ्या फोंडाघाट मार्गावरच हे विहंगम दृश्य येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करत आहे.
4
रिमझिम पडणारा पाऊस, कोवळं ऊन आणि धुक्याची चादर हे पाहून जणू स्वर्गात आल्याचा भास होताना दिसतो.
5
अशी धुक्याची चादर फक्त आंबोलीत पाहायला मिळते.
6
मात्र आज फोंडाघाटाचं हे रुप पाहून आंबोलीत आल्याचा भास होत आहे.
7
धुक्यात हरवलेले रस्ते, रस्त्यालगत असलेल्या दरीत धुक्याची चादर, अल्हाददायक वातावरण इथे पाहायला मिळत आहे.
8
अशा वातावरणात गाडी चालवताना ही एक सुखद अनुभव वाहन चालकांना मिळत आहे.
9
सध्या हे धुके दिवस-रात्र पसरलेलं आहे.