Sindhudurg Chipi Airport : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरुन अनियमित विमानसेवा, प्रवाशांचा खोळंबा

कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरुन आता अनियमित विमानसेवा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एक दिवसाआड मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई विमानसेवा सुरु आहे.

मोठा गाजावाजा करत ही कोकणातील विमानसेवा मी सुरु केली हे सांगण्यासाठी सर्वच पक्षाचे राजकीय पक्षांचे पुढारी पुढे आले होते आणि आपल असं योगदान आहे हे सांगत होते.
मात्र आता हीच विमानसेवा अनियमित झाली असून याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं लक्ष नाही.
येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना आहे.
पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जायचं.
मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चिपी विमानतळाला बॅरिस्टर. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घेतला
दरम्यान सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ 9 ऑक्टोबर 2021 पासून नियमित सुरु झालं आहे.