PHOTO : निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची गर्दी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी वैभव केळकर यांनी कुणकेश्वर मंदिराची ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्ये टिपली आहेत.
एका बाजूला समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.
कुणकेश्वर मदिर पांडवकालीन पुरातन असून याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे.
महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.
काशी इथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर इथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते.
श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते.
जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.
हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल