PHOTO : मिस युनिव्हर्स हरनाज संधूने लूक बदलला, ब्लॉण्ड हेअरमध्ये फोटोशूट
सौंदर्यवती हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून देशाचं नाव उंचावलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण मिस युनिव्हर्स बनल्यापासून हरनाज तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
आता पुन्हा एकदा हरनाजचे असे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मिस युनिव्हर्स हरनाज संधूने ग्लॅमरस अंदाजात नवीन फोटोशूट केलं आहे.
हरनाजच्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
हरनाजचा लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले तर अनेकांना हरनाजची स्टाईल आवडली आहे.
या फोटोशूटमध्ये हरनाज ब्लॉण्ड हेअरमध्ये दिसत आहे.
हरनाजने ब्लॉण्ड हेअरला हरका कुरळा लूक देऊन केस खुले ठेवले आहेत.
फोटोंमध्ये हरनाज निळ्या रंगाच्या सॅटिन शर्टमध्ये दिसत आहे. शर्टला मॅचिंग आयशॅडो लावून तिने स्मोकी लूक कॅरी केला आहे.
या लूकमध्ये हरनाज खूपच जबरदस्त दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची पोज किलर आहे.
हरनाजचा हा बदललेला लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
चाहत्यांचे म्हणणं आहे की हरनाज कोणताही लूक कॅरी करु शकते. तर हरनाज या लूकमध्ये अगदी वेगळी दिसत असून तिला ओळखणंही कठीण आहे.