Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bioluminescent Mushroom : तळकोकणात आढळली रात्री चमकणारी अळंबी, महाराष्ट्रातील पहिलीच नोंद
तुम्ही केव्हा चमकणारी अळंबी पाहिलीत का? नाही ना... मग आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चमकणारी अळंबी, तीही कोकणात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे.
महाराष्ट्रातील पहिलीच चमकणारी अळंबीची नोंद जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गात झाली आहे.
या अगोदर चमकणारी अळंबी केरळ राज्यात आढळली होती, त्यानंतर दुसरी नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अगोदर चमकणारी बुरशी आढळली होती तीही तिलारी खोऱ्यात. मात्र आता चमकणारी अळंबी आढळली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ 'बायोलुमिनिकन्स फंगी' म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे.
महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा दुर्मिळ अळंबीची नोंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने समृद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.