Turmeric : हिंगोलीत हळदीची प्रतिक्विंटल 35 हजार रुपये दरानं विक्री
हिंगोलीत (Hingoli) हळदीला (Turmeric) आत्तापर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.
हळदीच्या दरामध्ये (Turmeric Price) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे ववातावरण पाहायला मिळत आहे.
मागील महिनाभरापासून हळदीच्या भावामध्ये विक्रमी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.
वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खांडेगाव येथील शेतकरी माधवराव पतंगे यांच्या हळदीला 35 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.
माधवराव पतंगे यांनी त्यांच्याकडे असलेली 10 क्विंटल हळद वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली होती
हळदीचा दर्जा चांगल्या पद्धतीचा असल्याने या हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. हळदीला विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी माधवराव पतंगे आनंदी झाले.
मागील आठवड्यामध्ये हळदीला तीस हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. हा आत्तापर्यंतचा विक्रमी दर मानला जात होता. परंतू या आठवड्यात हळदीला 35 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकरी माधवराव पतंगे यांनी 10 क्विंटल हळद विकून तीन लाख 50 हजारांचा मोबदला मिळाला आहे.