Sindhudurg : पर्यटकांची तुफान गर्दी, चार तासापासून आंबोलीत वाहतूक कोंडी
पावसाळ्यात पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडले आहेत. सिंधुदुर्ग येथील अंबोली घाट येथे नागरिकांनी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे गेल्या चार तासापासून आंबोलीत ट्रॅफिक जाम झाले आहे. आंबोलीतील ट्राफिक सुरळीत होण्यासाठी अजूनही तीन तास लागण्याची शक्यता आहे.
आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रॅफिकमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांना तीन ते चार तास ट्रॅफिक मध्ये अडकून प्रवास करावा लागतोय. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आंबोलीत आलेल्या पर्यटकांच्या बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे ट्राफिक जाम झाले आहे. पोलीस प्रशासन, गावकरी आणि वनविभागाने घेतलेल्या बैठकीतील निर्णय कागदावरचं असल्याचे दिसतेय.
आंबोलीत पर्यटकांच्या गाड्या पार्क करून रिक्षा किंवा बसने मुख्य धबधब्यापर्यंत परडकांना सोडण्याचा निर्णय कागदावरच झालाय. प्रत्यक्षात मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
पर्यटकांची तुफान गर्दी, चार तासापासून आंबोलीत वाहतूक कोंडी