आंबोलीत निसर्गाचा अविष्कार, सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीच्या निळ्या जांभळ्या फुलांची पर्यटकांना पर्वणी
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत निळ्या जाभळ्या रंगानी सजला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतात. असाच एक आगळावेगळा निसर्गाचा अविष्कार जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.
आंबोलीत तब्बल सात वर्षांनी फुलणारी कारवी फुलली आहेत. या निळ्या जाभळ्या कारवीच्या फुलांचा रंग, आकार आणि सुगंधही वेगवेगळा असतो.
मनमोहक, आकर्षक दिसणारी ही कारवीची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. कारवीची फुले आंबोली घाटाच्या दुतर्फा फुलल्याने आंबोली घाट निळ्या जांभळ्या रंगांनी बहरला आहे.
पश्चिम घाटात ही फुल फुलली आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये अशा प्रकारची कारवीची फुले फुलतात.
आंबोलीत तीन प्रकारची कारविची फुले फुलतात. दरवर्षी फुलणारी, सात वर्षांनी फुलणारी आणि 14 वर्षांनी फुलणारी कारवी आहेत. यावर्षी आंबोलीत सात वर्षांनी फुलणारी कारवी फुलली आहेत.
निळ्या जाभळ्या रंगांच्या या कारवीच्या फुलांपासून काळ्या रंगांचा मध काढला जातो. तसेच या मधापासून वाईन तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे.
या मधाचा औषधी उपयोग असल्याने या मधाला मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात आंबोली आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणी कारवीची फुलं फुलतात.
कारवीची फुल पाहण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी देशभरातून पर्यटक आंबोलीत येतात. आंबोली नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते.
आंबोली सध्या निळ्या जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांनी बहरली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीकडे पहायला मिळत आहे.