आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा; IRCTC कडून प्रवाशांना गिफ्ट
प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे.
'ट्रॅव्हल नाऊ अॅण्ड पे लेटर' अशा या नव्या खास सुविधेचे नाव आहे.
ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट अॅपवरही उपलब्ध आहे.
'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे.
अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा स्थितीत 'Travel Now Pay Later' चा वापर करता येईल.
या नव्या सुविधेमुळे प्रवासी तिकीट बुक करू शकतात. तुम्ही EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता.
CASHe च्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' साठी साधारण आणि तात्काळ तिकीट बुक करू शकता.
तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकता.
या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.