Ram Navami 2023: राम राम जय राजा राम... राम नवमीच्या निमित्तानं तळकोकणात साकारलं वाळुशिल्प
आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातही राम नवमीनिमित्त ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
अनेक कलाकारांनी हटके अंदाजात राम नवमीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
कुणी रांगोळीतून, कुणी सुंदर चित्रातून तर कुणी गाणं गाऊन रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वाळुशिल्पकारांनी रामनवमीनिमित्त खास वाळुशिल्प साकारलं आहे.
आरवलीमधील प्रसिद्ध वाळुशिल्पकार रविराज चीपकर यांनी राम नवमी निमित्तानं वाळुशिल्प साकारलं आहे.
आरवलीमधील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळुवर संगसंगती देत प्रभू रामांच वाळुशिल्प साकरलं आहे.
समुद्र किनाऱ्यावरील वाळुपासून हे वाळुशिल्प साकारलं आहे.
प्रभू श्रीरामाचं वाळुशिल्प साकारण्यासाठी रविराज चीपकर यांना एका तासाचा वेळ लागला.