Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात
पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.
पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस (Aurangabad Police) जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं, यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर काही तरुणांनी गोंधळ घातला असून, मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पेटलेल्या वाहनांवर पाण्याचा फवारे मारून आग विझवली.
सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तर आज सकाळी राम मंदिरात नेहमीप्रमाणे पूजापाठ सुरु असून, भाविक देखील दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे.