PHOTO : कावळेसाद पॉईंटवर फुलली दुर्मिळ कारवी!
पश्चिम घाटात निसर्गाच्या आविष्काराचं एक आगळंवेगळं रुप पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजणू फुलांचा महोत्सवच आंबोलीत भरला आहे.
अतिशय दुर्मिळ आणि अतिशय धोकादायक ठिकाणी स्ट्रॉबेलांतस स्कॉब्युक्युलाटा या प्रजातीची कारवी फुलली आहेत
आंबोली जवळच्या गेळे गावातील कावळेसाद पॉईंट येथे फुलली आहेत.
कावळेसादच्या 1000 ते 1500 फूट उभ्या कड्या कपाऱ्यावर ही कारवी झुडपाची फुलं फुलली आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्येच या कारवीचं अस्तित्त्व पाहायला मिळतं.
महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा या ठिकाणी काही भागांमध्येच या कारवीचं अस्तित्त्व पाहायला मिळतं.
या कारवीला सपुष्पा स्कॉब्युक्युलाटा किंवा स्ट्रॉबेलांतस स्कॉब्युक्युलाटा म्हटलं जातं.
कारवीचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या काही कारवी सात वर्षांनी फुलतात तर काही कारवी बारा वर्षांनी फुलतात. तर काही दरवर्षी फुलणारे सुद्धा आहेत.
त्यामुळे वनस्पती अभ्यासक, निसर्गप्रेमी, पर्यटकांमध्ये ही कारवी बघण्यासाठी खूप उत्साह आहे.
निसर्गाच्या या अद्भुत आणि खूपच दुर्मिळ अशा नजाऱ्याचा आनंद तुम्हालाही घ्यायचा असल्यास आंबोलीत या.....