MG ची स्वस्त इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये होऊ शकते लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

MG Air EV

1/10
MG Motors India 2023 च्या सुरुवातीला आपली दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
2/10
ही कार कॉम्पॅक्ट सिटी कार असेल. ही आगामी कार इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या Wuling Air EV सारखी असेल.
3/10
पुढील वर्षी 13 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान देशात ऑटो एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. या इव्हेंटमध्ये MG मोटर आपली आगामी इलेक्ट्रिक कार MG Air EV देखील सादर करू शकते.
4/10
या आगामी MG Air EV कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर ती Wuling Air EV सारखी असू शकते. याची लांबी सुमारे 2,974 मिमी, रुंदी 1,505 मिमी, उंची 1,631 मिमी, तर व्हीलबेस 2,010 मिमी असू शकते.
5/10
ही कार पीएमव्ही इलेक्ट्रिककडून नुकत्याच लॉन्चझालेल्या Eas-E सारखी असू शकते.
6/10
रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही आगामी कार एका चार्जवर 200 ते 300 किमीची रेंज देऊ शकते.
7/10
ही ईव्ही टाटा टियागो ईव्ही आणि टाटा टिगोर ईव्हीला टक्कर देईल.
8/10
MG Air EV ला 68hp पॉवर आउटपुटसह सिंगल फ्रंट-एक्सल फिट इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते. तसेच 20-25 kWh बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे.
9/10
MG Air EV ही Wuling Air EV सारखीच असेल, जी ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
10/10
या आगामी ईव्हीची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. ऑटो एक्सपोमध्ये याचे अनावरण होण्याची अपेक्षा आहे. याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असावी असा अंदाज आहे.
Sponsored Links by Taboola