सिंधुदुर्ग किल्ल्यावरून दर्याला नारळ अर्पण...नारळ लढवण्याची स्पर्धा; तळकोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह; पाहा फोटो
शिवकालीन काळापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावरून पहिला मानाचा नारळ समुद्राला अर्पण केला जातो. त्यानंतर इतर मच्छिमार बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यातील किनारपट्टी भागात मच्छिमार बांधवांनी समुद्र किना-यावर एकत्र येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
नारळ अर्पण करताना, हे समुद्र देवता आजपासून तुझ्या यम लहरी शांत कर आणि आम्हाला आमच्या व्यवसाय करायला वृद्धी दे, आमच्या व्यवसायात यश दे. अशी प्रार्थना कोळी बांधव समुद्राला करतात.
यावेळी मालवण समुद्र किनाऱ्यावर महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धाही घेण्यात आल्या.
विविध मंडळांनी या नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
यावेळी महिला वर्गाने पारंपारिक वेशभूषेत या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी महिलांचीही मोठी गर्दी या वेळी झाली होती.
नारळ लढविणे स्पर्धेत महिलांना सोन्याचा नारळ, पैठणी, सोन्याची नाथ तसेच इतर विविध वस्तूचे वाटप करण्यात आले.