Sindhudurg News : सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात पर्यटकांची गर्दी; पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली'; पाहा फोटो
सलगच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सलगच्या सुट्ट्यामुळे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणुन ओळख असलेल्या आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या आंबोलीत देशाच्या काना कोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
राज्याबरोबरच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात इथून ही मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत.
आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी दाटी झालेली दिसून येत आहे.
घाटमाथ्यावरून कोकणात येत असताना आंबोली घाटातील पर्यटन स्थळे पर्यटकांची गर्दी होत आहे.
त्यासोबतच घाटातून खाली उतरल्यानंतर वाफोली धरण क्षेत्रात सुरू झालेल्या वॉटर स्पोर्टच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
समुद्र पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी वाफोली धरण क्षेत्रातील वॉटर स्पोर्ट मधील जेस्की, बनाना राईड, फिश राईड, बंपर राईड, स्पीड बोट अश्या जलक्रीडाचा आनंद पर्यटक लुटत आहेत.