Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी पर्यटकांनी बहरली, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी
वर्षा पर्यटनामुळे आंबोली बहरली आहे. आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंगरदऱ्यात उतरणारे ढग, डोंगराच्या कडेकपारीतून कोसळणारे धबधबे दिसून येत आहेत.
रिमझिम पाऊस, सर्वत्र पडलेली दाट धुक्याची चादर, अंगाला झोंबणारी थंडी असं वातावरण आंबोलीत पाहायला मिळत आहे.
नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई यामुळे पर्यटक आंबोलीत मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले आहेत.
वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेली आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे.
त्यासोबत आजूबाजूचे इतरही अनेक धबधबे प्रवाहित झाले असल्याने पर्यटनाचा आनंद लुण्यासाठी पर्यटकांची पावलं आंबोलीकडे वळू लागली आहेत.
त्यामुळे निसर्गाने बहरलेली आंबोली आता गर्दीनेही बहरू लागली आहे.
आंबोलीच्या डोंगर दऱ्यातून खाली कोसळणारे धबधबे, दरीत उतरणारे कापसासारखे ढग, रिमझिम पाऊस, सर्वत्र पडलेली धुक्याची चादर, अंगाला थंडी, हिरवीगार वनराई यामुळे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत हजेरी लावत आहेत.
आंबोळी घाट वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. वींकेड असल्याने येथे पर्यटकांचा ओघ पाहायला मिळत आहे.