Koyna Dam : कोयना धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी सकाळपर्यंत गेल्या नवजाला सर्वाधिक 201 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
कोयना धरणात पाण्याची मोठी आवक असल्याने 52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
कोयना नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विसर्ग सुरु झाल्याने बंद पडलेली वीज निर्मिती सुरु होणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातच पावसाचा जोर आहे.
पूर्व भागाकडे अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कोयना, नवजा, कास, बाणमोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पावसाचा जोर आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरडी, झाडे कोसळू लागल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.