Satara ST : बंदमुळे सातारा एसटी स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट, प्रवाशांचे हाल
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
04 Sep 2023 01:20 PM (IST)
1
जालन्यातील मराठा आंदोलकावर लाठीमाराच्या घटनेनंतर सातारा बंद पुकारण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बंदमुळे सातारा एसटी स्टँड परिसरामध्ये सध्या शुकशुकाट दिसत आहे.
3
जे प्रवासी बाहेरगावावरुन आलेले आहेत त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
4
शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी एसटी फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत.
5
तसेच एसटी स्टँडमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांना पायी चालत जावे लागत आहे.
6
डोक्यावर बोचकी, बॅगा घेऊन या प्रवाशांना आपल्या घराची वाट धरावी लागत आहे.
7
या बंदमुळे एसटी महामंडळाला याचा फटका बसला आहे.
8
शिवाय प्रवाशांनाही एसटी बंद असल्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.