Maratha Reservation : औरंगाबाद जिल्ह्यात बंदची हाक, ठिकठिकाणी आंदोलन; पाहा फोटो
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज (04 सप्टेंबर) बंदची हाक देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यात औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात आज बंद पाळला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे रस्ता रोको व कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
गल्लेबोरगाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली आहे.
दुसर्या दिवशीही महालगांव येथे कडकडीत बंद पाळुन रास्ता रोको आंदोलन सुरु आहे.
बोर दहेगाव येथील शेडफाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
आडगाव जावळे येथे रस्ता रोको आंदोलन शांतता करण्यात येत आहे. तर वाहतूक सुरळीत चालू आहे.
पाचोड हद्दीमधील मुरमा फाटा येथे सकाळी रस्ता रोको शांततेत होऊन संपलेला आहे.
कन्नड तालुक्यातील हतनूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला असून, व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहे.
वैसपूर टाकळी येथे देखील जालना येथील घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली.
सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा सकल मराठा बांधवांनी रोखला.
औरंगाबाद शहरात देखील बंद पाहायला मिळत असून, पोलिसांचा मोठं बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.