Bagad Yatra : साताऱ्यातील बगाड यात्रेचा उत्साह, लाखो भाविकांचा जल्लोष
'अगं बाई अरेच्चा' चित्रपटात दाखवण्यात आली आहे तिच ही बगाड यात्रा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे. साताऱ्याच्या बावधनमधील भैरवनाथाची बगाड यात्रा (Bagad Yatra) फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे.
सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन हे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. या गावची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी एक मानली जाते.
बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये दाखल झाले आहेत. 50 फुट उंच लाकडी बगाडाला बांधून बैलजोडीच्या साहाय्याने शेतातून पळवून नेण्याची परंपरा आहे.
रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा.
या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगिनींना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे.
या बगाडातील एक खास वैशिष्ट्य म्हणजे, या बगाडाला जुंपली जाणारे शेकडो बैल. नव्याच्या पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमेपासून या उत्सवाला सुरुवात होते.
बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात. हे कळक तोडण्यासाठी संपूर्ण गाव जमा होतं. कळकांच्या बेटाजवळ गेल्यानंतर सर्वात मोठं कळक याठिकाणी शोधलं जातं
त्यानंतर ते कापून वाजत गाजत गावात आणलं जातं. या बगाडासाठी खास बाभळीची लाकडं तोडून तीही वाजत गाजत गावात आणली जातात.
बगाडाच्या गाड्यावर मधला खांब उभा करण्यासाठी एक मोठं चौकोनी लाकूड असतं. त्यामध्ये उभा खांब बसवला जातो. या बसून मानकरी नवस पूर्ण करतात. हा बगाडा बैल जोडींकडून ओढला जातो.
आज बगाड यात्रेला खासदार उदयनराजे यांनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा उत्साह पाहायला मिळाला.
खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीमुळे भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
दरवर्षी रंगपंचमी दिवशी बगाड यात्रा पार पडते. याची सुरुवात माघ पौर्णिमेपासून होते.
धूलिवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात.
रंगपंचमी (Rangpanchmi) म्हणजेच रंगांचा सण. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीला साजरा केला जातो.