महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं!
राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अशातच महाराष्ट्राचे (Maharashtra) मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये तापमान (Mahabaleshwar Temperature) चांगलेच घसरले आहे.
महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तापमान खालावल्याचे पाहायला मिळत आहे.
वेण्णालेक भागात पर्यटकांची मोठी गर्दी
वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
तर महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या वाढत्या थंडीत देखील महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. या पर्यटकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काल रात्री या परिसरात तापमान घसरले असताना आता सकाळी वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.