CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे मूळ गावी दाखल, इलेक्ट्रिक कारने सफर
CM Eknath Shinde Satara Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री सातारा (Satara) तील दरे गावात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या गावी म्हणजेच तीन दिवसांच्या दौऱ्यावर असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी हेलीपॅडवरून घरी जाण्यासाठी इलेक्ट्रिक कारला पसंती दिली.
मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी बैठकही पार पडली आहे.
साताऱ्यातील (Satara District) दरे (Dare Village) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचं मूळ गाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री काही दिवस दरे गावात मुक्काम करणार असून विविध विकास कामांचा आढावा घेतील.
मुख्यमंत्री सातारा दौऱ्यादरम्यान कोयना पर्यटन आणि या परिसरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत.
याआधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ऑगस्ट महिन्यात सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचं हेलिकॉप्टर काही काळ भरकटलं होतं.
हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते आणि त्यानंतर पुन्हा साताऱ्यात पोहोचले.