Snake Venom : सापाच्या विषाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो, मग त्याच विषाची नशा कशी केली जाते?
सध्या बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) चं रेव पार्टी (Rave Party) हे प्रकरण चर्चेत आहे. (Image Source - istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोएडा पोलिस आणि वन विभागाने 2 नोव्हेंबर रोजी 9 सापांसह 5 जणांना अटक केली. (Image Source - istock)
या नऊ सापांमधील 5 साप कोब्रा जातीचे होते, जे अतिशय विषारी म्हणून ओळखले जातात. तर, या व्यतिरिक्त एक अजगर आणि एक वेगळ्या जातीचा साप होता. (Image Source - istock)
यासोबतच आरोपींकडून 20 मिली सापाचं विषही आढळून आलं. या सापाच्या विषाचा वापर दिल्लीतील रेव पार्टीमध्ये नशेसाठी केला जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (Image Source - istock)
या प्रकरणात बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Image Source - istock)
मागील काही वर्षांमध्ये रेव पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची नशा करण्याचा ट्रेंड आहे. सापाच्या विषाबाबत सर्वसामान्यांच्या मनात भीती असते. पण, सर्व साप विषारी नसतात. रिपोर्टसनुसार, फक्त 30 टक्के साप विषारी असतात. (Image Source - istock)
या सापांपैकी काही सापांच्या विषाचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो. या विषाचा परिणाम होऊन आपला मेंदू काही काळासाठी सुन्न होतो. (Image Source - istock)
विषाची नशा करताना त्याचा डोस फार मर्यादित ठेवला जातो. याचं प्रमाण जास्त असेल, त्यामुळे पॅरालेसिसचा अटॅक येण्याचा धोका असतो. (Image Source - istock)
या विषाच्या सौम्य डोसमुळे माणसाचा मेंदू काही तासांसाठी नशा होते. सापाच्या विषापाची ही नशा इतर नशेच्या तुलनेत जास्त असते आणि त्याचा परिणाम धोकादायकही होऊ शकतो. (Image Source - istock)
सापाच्या विषाच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू होण्याचीही शक्यता असते. (Image Source - istock)