Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह रमले शेतात
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह रमले शेतात. केळीची लागवड केली.
पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली.
कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंतरी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक ग्रामस्थ समस्या घेऊन तसेच त्यांची कामे घेऊन आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सोडवल्या.
मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्ती शेती करण्याचे धोरणं अवलंबल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या गावी शेती आहे. दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. या शेतामध्ये त्यांनी आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबी, सफरचंद, नारळ, केली या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.