सांगलीत कृष्णा नदीत प्रदूषित पाण्याने हजार माशांचा तडफडून मृत्यू
सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात प्रदूषित पाण्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीजवळ असलेल्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत.
यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे.
नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाले आहेत.
मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीमध्ये झुंबड उडाली आहे.
मोठे मासे देखील या ठिकाणी मृत पडले आहेत.
साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दुषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जात आहे.
प्रदूषण महामंडळ याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार? हे बघावं लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावमध्येही कृष्णा नदीपात्रात रासायनिक मळीचे पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
उदगावमध्ये कृष्णा नदीची गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची पातळी घटली आहे.