सांगली : तिसऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राचा नंदलाल झा 'भारत सर्वश्रेष्ठ'
मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या प्रांगणात तिसरी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नंदलाल सीताराम झा याने 'भारत सर्वश्रेष्ठ' हा किताब पटकावला.
प्रथम क्रमांकास रोख 1 लाख रूपयांचे बक्षीस संजय भोकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
फर्स्ट टाइम विजेत्या मध्ये अजिंक्य सूर्यकांत पवार, मास्टर विजेता मध्ये महाराष्ट्रातील शास्वत शंकर मानकर, सब ज्युनिअरमध्ये मध्य प्रदेशचा दक्ष हळदकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.
श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
तालीम संस्थेच्या क्रीडांगणावर अॅम्यॅच्युअर बॉडीबिल्डंग असोसिएशन, फिसिक स्पोर्टस् फेडरेशन इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली 'तिसरी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२२-२३' या स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या.
भव्य व्यासपीठ, पिळदार शरीर आणि भव्य लाईटच्या झगमगटात ही स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेसाठी अनेक राज्यातून सुमारे 1150 हून अधिक शरीर सौष्ठवांनी आपली उपस्थिती लावून मिरजेतील तिसर्या शरीर सौष्ठव स्पर्धेत रंगत आणली.
तत्पूर्वी या उत्तम दर्जाच्या आणि चांगल्या तसेच या स्पर्धेत पंच म्हणून सहभागी असलेल्या सर्व पंचांचा श्री. अंबाबाई तालिम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक महंमद मणेर उपस्थित होते.
फर्स्ट टाइम विजेत्यांमध्ये अजिंक्य सूर्यकांत पवार, मास्टर विजेतामध्ये महाराष्ट्रातील शास्वत शंकर मानकर, सब ज्युनिअरमध्ये मध्य प्रदेशचा दक्ष हळदकर, ज्युनिअरमध्ये कर्नाटकाचा सुशील कुमार, सिनिअरमध्ये नंदलाल सीताराम झा, मेन्स फिजीक्यूमध्ये कर्नाटकाचा दिलीप कुमार आर, आणि महिला फिजीक्यूमध्ये महाराष्ट्राची हिरा सोळंकी या विजेत्या झाल्या. या स्पर्धेत विजेत्यांना एकूण सात लाखांचे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे पदाधिकारी श्रीकांत परब, नारायण सावंत यांनी केले होते.