पाऊले चालती पंढरीची वाट... गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत, पाहा ड्रोनच्या नजरेतून
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे . (छाया - प्रशांत खिल्लारे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोली जिल्ह्यांमध्ये या पालखीचा आजचा तिसरा आणि शेवटचा मुक्काम आहे. आज पालखी जवळा बाजार या ठिकाणी मुक्कामी असेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)
हिंगोलीत टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण झालेय. गुरुवारी ही पालखी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. (छाया - प्रशांत खिल्लारे)
या पालखीमध्ये एकूण साडेसातशे वारकरी सहभागी झाले असून आषाढी एकादशीनिमित्त ही वारी पंढरपूरला पोहोचत असते. एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)
या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे. बुधवारी रात्री या पालखीचा मुक्काम हिंगोलीचा डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये झाला असून पुढील पायी प्रवासासाठी पालखी निघाली आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)
अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं. (छाया - प्रशांत खिल्लारे)
हातात टाळ आणि मृदुंग विठ्ठल नामाचा जयघोष अशा या भक्तीने वातावरणामध्ये ही पालखी मजल दरमजल करत पंढरपूर कडे प्रवास करत आहे. (छाया - प्रशांत खिल्लारे)