Ashadhi Wari 2023 : स्वच्छतागृहांपासून ते रुग्णवहिकेपर्यंत; वारकऱ्यांच्या सेवेसाठी आळंदीत आरोग्य यंत्रणा सज्ज
आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतापमानाचा पारा वाढत असल्याने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण तयारी करण्यात येत आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन आणि विश्वस्त मंडळ सज्ज झालं आहे.
अनेक ठिकाणी तंबू टाकण्यात आले आहेत आणि काही अंतरावर योग्य आरोग्य सेवा पुरवता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथकांची सोय करण्यात आली आहे.
औषधांचा साठादेखील पुरवण्यात आला आहे.
सोबतच प्रसाधनगृहाची देखील सोय करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकांची देखील सोय करण्यात आली आहे.