Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : 'गण गण गणात बोते'च्या गजरात गजानन महाराज यांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यात प्रवेश
संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App26 मेला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय.
यावर्षी पालखीत 700 वारकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
पालखी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सुमारे 725 किमीचा दौरा करीत 27 जून रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूरच्या घाटातून मेडशीत प्रवेश करताना पालखीचं ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्यानं 'एबीपी माझा'चे अकोला जिल्ह्यातील बाभूळगावचे प्रेक्षक वैभव डोंगरे यांनी या पालखीचं चित्रीकरण केलंय.
सुमारे 30 दिवसांत, तब्बल साडेपाचशे किलोमीटरची वाट तुडवत बुलढाण्यातून विठ्ठलभक्त गजानन महाराजांच्या सोबतीने पंढरपूरकडे निघाले आहेत.
27 जून रोजी ही पालखी पंढरपुरात पोहोचेल आणि आषाढीला गजानन महाराज विठ्ठलाची गळाभेट घेतील.
आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.