Uses Of Coconut Husk : नारळच नाही तर त्याची साल सुद्धा आहे खूप उपयुक्त, जाणून घ्या फायदे
नारळाच्या शेंड्यांचा उपयोग सूज उतरण्यासाठी होतो. सूज उतरवण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची पावडर करुन त्यात हळद घालावी. थोडं पाणी घालून त्याचा लेप तयार करावा. हा लेप सूज आलेल्या जागी लावावा. या लेपामुळे सूज कमी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारळाच्या सालीने दातांचा पिवळेपणा दूर होतो. त्यासाठी नारळाच्या शेंड्या भाजून घ्याव्यात भाजलेल्या शेंड्या मिक्सरमधे वाटून त्याची पावडर करुन घ्यावी. या पावडरमधे बेकिंग सोडा मिसळा. या मिश्रणानं दात घासावेत. यामुळे दातांचा पिवळेपणाही निघून जातो.
नारळाची साल केसांसाठीही खूप फायदेशीर असते. नारळाच्या शेंड्या कढईत गरम करुन घ्याव्यात. शेंड्या चांगल्या भाजल्या गेल्या की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करावी. ही पावडर खोबरेल तेलात मिसळून हे मिश्रण केसांना लावावं.
नारळाच्या सालीने मूळव्याधाची समस्या दूर होऊ शकते. तुम्हाला नारळाची साल भाजून त्याची पावडर तयार करायची आहे. या पावडरचे दररोज रिकाम्या पोटी पाण्यासोबत सेवन करावे. यामुळे मूळव्याधाची समस्या दूर होण्यास मदत होईल.
नारळाची साल मासिक पाळीच्या वेदना कमी करू शकते. नारळाच्या शेंड्या भाजून त्याची पावडर करुन ती पाण्यासोबत घेतल्यास वेदना कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.