PHOTO : देशभक्तीला सलाम; ध्वजस्तंभाच्या दुरूस्तीसाठीचे पाच लाख रुपये नाकारले
रत्नागिरी शहरात जयस्तंभ या भागात 100 फुटी ध्वजस्तंभ (Tiranga Flag) उभारण्यात आला आहे. हळूहळू हे ठिकाण प्रसिद्धीस येऊ लागले. पण, मागील दोन वर्षापासून या ध्वजस्तंभावरील ध्वज काही तांत्रिक कारणास्तव उतरवून ठेवण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाऱ्याच्या वेगापुढे स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत देखील नाही. शिवाय केबल रोपवे देखील तुटला होता. त्यामुळे नवीन ध्वज लावण्यास अडचणी देखील येत होत्या.
ध्वज पुन्हा डौलानं फडकावा यासाठी प्रशासन देखील प्रयत्न करत होते. पण, आवश्यक असणारी क्रेन देखील उपलब्ध होत नव्हती. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिम देखील हाती घेण्यात आली आहे.
सध्या हर घर तिरंगा मोहिम देखील जोरदारपणे राबवली जात आहे. परिणामी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी (Ratnagiri Collector Office) कार्यालय येथील ध्वज डौलानं फडकावा यासाठी प्रयत्न देखील केले जात होते. त्यासाठी क्रेनचा शोध देखील जारी होती.
ज्या क्रेनच्या मदतीनं ध्वजस्तंभाची दुरूस्ती केली गेली. त्या क्रेनचे 8 तासांचे भाडे 5 लाख रूपये इतके आहे. जिल्हा प्रशासनानं काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्रेनवाल्याला 5 लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. पण, क्रेन मालकानं ध्वजाची दुरूस्ती केली आहे. त्यामुळे पैसे नकोत असं सांगत प्रांजळपणे 5 लाखांचे भाडे नाकारले.