रिफायनरीचं सर्वेक्षण 'पेटलं'; महिला आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या, तर माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची दमदाटी
Ratnagiri Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला.
आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या.
जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशा भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना दमदाटी केली.
पुन्हा इथं दिसायचं नाही, अशा भाषेत पोलीस वार्ताहारांशी बोलत होते.
काही पत्रकारांना तर हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही कोकणातले नेते मात्र रिफायनरीच्या मुद्द्यावर मूग गिळून बसले आहेत.
बारसू-सोलगाव रिफायनरीच्या ताज्या आंदोलनाच्या ठिकाणी मात्र कोकणातील एकही नेता फिरकलेला सुद्धा नाही.
रिफायनरीच्या लढ्यात केवळ सामान्य जनता आणि रिफायनरी विरोधी संघटनाच उरली आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.