Ram Mandir : अयोध्येनंतरचं सर्वात मोठं राम मंदिर कोणते? बालस्वरूपात प्रभू राम उपस्थित!
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ : हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. तेथे भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत.मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा : हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. शहराच्या मध्यभागी स्थित मंदिर हे भगवान रामाच्या भक्तांसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
कोदंडराम मंदिर, कर्नाटक : हे मंदिर कर्नाटकातील हिरेमागलूर येथे आहे, जे चिकमंगळूर जिल्ह्यात येते. या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे, कारण येथे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर : हे मंदिर अमृतसरच्या पश्चिमेला 12 किलोमीटरवर चोगवान रोडवर आहे. हे ते ठिकाण आहे, जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता. येथेच तिने लव आणि कुशला जन्म दिला. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
रघुनाथ मंदिर, जम्मू : जम्मूच्या या मंदिरात सात मंदिरे आहेत. हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचे पुत्र महाराज रणबीर सिंग यांनी 1853-1860 या काळात बांधले होते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
रामराजा मंदिर, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते. रामराजा मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे प्रभू रामाला दररोज चार वेळा बंदुकीची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) दिली जाते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरातून 11 दिवसांच्या विशेष विधीची सुरुवात केली होती. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आहे.असे म्हणतात की, हे मंदिर त्याच ठिकाणी आहे जिथे प्रभू राम वनवासात राहिले होते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
रामास्वामी मंदिर, तामिळनाडू : हे मंदिर 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा : भारतात हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.हे मंदिर भद्राचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
श्री सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा : भद्राचलममधील सीता रामचंद्र स्वामी मंदिराचा इतिहास रामायणासोबत सामायिक केला आहे. हे मंदिर भद्राच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)