rare snake : बाप रे बाप... घरामध्येच आढळला दुर्मिळ फोर्स्टेन मांजऱ्या साप! पाहा फोटो
रायगडच्या सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये दुर्मिळ प्रजातीचा साप आढळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा दुर्मिळ साप साधारणपणे साडेचार फूट लांबीचा होता.
या दुर्मिळ सापाचे नाव फोर्स्टेन मांजऱ्या साप (Forsten cat snake) असे आहे.
हा साप घराच्या छताच्या पत्र्याखाली लोखंडी पाईपवर बसला होता.
या सापाला येथील सर्पमित्र संदीप जाधव यांनी मोठ्या शिताफीने पकडले.
सापाला पकडण्यात आल्यानंतर वनविभागाच्या मदतीने सुखरूप अधिवासात सोडून दिले.
या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचे सारखा रंग आणि चट्टे असल्याने हा मांजऱ्या साप किंवा कॅट स्नेक म्हणून ओळखला जातो.
फॉस्टेन कॅट स्नेक हा सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो.
याचे खाद्य पाल, सरडे, बेडूक इत्यादी प्रकारचे आहे.
मांजऱ्या प्रजाती सापामध्ये कॉमन कॅट स्नेक (साधा मांजऱ्या साप) सर्वत्र आढळतो पण फॉस्टेन कॅट काही विशिष्ट भागातच आढळतो.