Landslide : मोठी दुर्घटना, रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली
रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.
या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यामधील इरशाळगड इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे.
डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे.
आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे.
NDRF चे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, बचावकार्य सुरु असताना एका अग्निशमन विभागाच्या जवानाचा वर चढताना दम लागून मृत्यू झाला आहे.
इरशाळवाडीवर माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. रायगडमधील तळीये आणि माळीण गावावर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता.