रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
राज्यात गेल्या काही दिवसांत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून एसटी महामंडळाच्या बसेस बाबतीतही अपघाताच्या घटना घडत आहेत. नुकतेत रायगड जिल्ह्यात बस अपघाताची भीषण घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाड तालुक्यातील वरंध घाटामध्ये महामंडळाची एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी नाही.
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले, तसेच, बसमधील गंभीर जखमी प्रवाशांना उपाचारासाठी महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
अपघातात महाड भोर वरंध घाटामध्ये महामंडळाची एसटी बस पलटी होऊन 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.
भोर वरंध घाटामधील एका तीव्र वळणावर चालकाचा बसवरील अचानक ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बस घाटात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले, तसेच घटनेबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली.
बसच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल झाले आहेत. या घटनेनं तालुका प्रशासन व बस आगारही कार्यरत झाल्याचं पाहायला मिळालं.