Raigad : 30 फूट लांब, 8 टन वजन; रायगडजवळ आढळला महाकाय व्हेल मासा
मुंबईलगतच्या घारापुरी बेटाजवळ महाकाय व्हेल मासा आढळून आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुमारे ३० फूट लांबीचा ब्ल्यू- व्हेल प्रजातीचा मृत मासा आढळून आल्याने गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
मंगळवारी सायंकाळच्या उरण तालूक्यातील प्रसिद्ध घारापुरी बेटाजवळ मृतावस्थेतील महाकाय मासा आढळून आला. यावेळी, या घटनेची माहिती गावच्या सरपंचांना दिली असता त्यांनी तात्काळ ही माहिती उरणच्या वन विभागाला दिली.
आज दुपारच्या सुमारास वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता हा व्हेल प्रजातीचा मासा असल्याचे निष्पन्न झाले.
या माशाची लांबी ही सुमारे ३० फूट असून तो ब्ल्यू व्हेल प्रजातीचा मासा असल्याचे आढळून आले आहे. तर, या माशाचे वजन हे अंदाजे ७ ते ८ टन असून तो कुजलेल्या स्थितीत असल्याचे वन अधिकारी एन. कोकरे यांनी सांगितले आहे.
घारापुरीनजीक आढळून आलेला हा व्हेल हा कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याला बोटीच्या सहाय्याने समुद्रकिनाऱ्यापासून दूर नेण्यात आले. तर, या माशामुळे संपूर्ण किनाऱ्यावर दुर्गंधी पसरल्याचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले आहे.
यापूर्वी २०१८ साली उरण तालुक्यातील केगाव समुद्रकिनारी सुमारे ४२ फूट लांबीचा ब्ल्यू- व्हेल प्रजातीचा मृतावस्थेतील मासा आढळून आला होता.
या माशाच्या सांगाड्याचे नवी मुंबईतील ऐरोली येथील संग्रहालयात जतन करण्यात आले आहे.vhel