Duplicate Driving License: सहज बनवा तुमचे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, फॉलो करा या सोप्या ऑनलाइन स्टेप्स!
रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे. देशात ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रायव्हिंग लायसन्स शिवाय रस्त्यावर गाडी चालवल्याबद्दल तुम्हाला दंडही भरावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स हे असे कागदपत्र आहे की वाहन चालवताना ते नेहमी सोबत ठेवणे आवश्यक आहे. परंतु अनेकदा असे घडते जेव्हा आपण ड्रायव्हिंग लायसन्स हरवतो ज्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
पण तुम्ही तुमचं डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स अगदी सहज मिळवू शकता.तुमचं परमनेंट ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं असेल तर तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑफलाइन बनवण्यासाठी, तुम्हाला मूळ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केलेल्या ठिकाणी जावे लागेल. येथे तुम्हाला एलएलडी फॉर्म घेऊन सबमिट करावा लागेल. या फॉर्मसह, तुम्हाला विहित शुल्क देखील भरावे लागेल.
या संपूर्ण प्रक्रियेनंतर, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स 30 दिवसांत पोस्टद्वारे तुमच्या पत्त्यावर येईल.
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर, येथे मागितलेली सर्व माहिती टाकून एलएलडी फॉर्म भरावा लागेल.
दुसऱ्या टप्प्यात, फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला त्याची प्रिंट काढावी लागेल. आता तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
हे केल्यानंतर, आता तुम्हाला हा फॉर्म आणि तुमची कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करावी लागतील.
हे ऑनलाइन देखील सादर केले जाऊ शकतात.
ड्रायव्हिंग लायसन्सची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवले जाईल.