याला म्हणतात पुणेरी बाणा ! परवानगीशिवाय भिंतीवर चित्र काढल्यामुळे थेट महापालिकेला नोटीस
पुण्यातल्या कोथरुडमधल्या या ४०० फुटांच्या भिंतीवर अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलगी शिकली प्रगती झाली, पाणी अडवा पाणी जिरवा, डंक छोटा धोका मोठा, ओला सुका कचरा वेगळा करा, बेटी बचाव बेटी पढाओ, झाडे लावा, झाडे जगवा.. इतकं अमौलिक साहित्य महापालिकेनं लिहिलं...
आणि या भिंत मालक असलेल्या सोसायटीच्या डोक्यात तिडीक गेली...प्रश्न घोषवाक्यांचा नव्हता...
तर आपल्या भिंतीवर विनापरवानगी पुणे महापालिकेनं केलेल्या रंगरंगोटीचा होता...
स्वप्नशिल्प सोसायटीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या या चित्रकारीला धडा शिकवण्यासाठी थेट नोटीस धाडली...
स्वप्नशिल्प सोसायटीवाल्यांनी पुणे महापालिकेच्या या चित्रकारीला धडा शिकवण्यासाठी थेट नोटीस धाडली... आणि १६ लाख रुपयांची भरपाई मागितली
थेट १६ लाखांचा भुर्दंड बसणार म्हंटल्यावर पुणे महापालिका हादरली... आणि आयुक्तांकडून तातडीने उत्तर आलं...
पण प्रश्न असा आहे... की फुकटात ४०० फुटांची भिंती रंगवून मिळाली होती... तर त्याविरोधात सोसायटीनं तक्रार का केली?
पण प्रश्न असा आहे... की फुकटात ४०० फुटांची भिंती रंगवून मिळाली होती... तर त्याविरोधात सोसायटीनं तक्रार का केली?
याला म्हणतात पुणेरी बाणा... नियम म्हणजे नियम... मग तो पेंटर असो... वा पालिका...
आमच्या भिंतींवर तुमच्या चित्रकलेचं प्रदर्शन करायचं असेल... तर आधी शुल्क भरा.. मग खुशाल रंगवा... सोसायटीवाल्यांचा नोटिशीचा डंख छोटा होता... पण पालिकेनं त्यातला मोठा धोका ओळखला... आणि तातडीने शरणागती पत्करली...