Vande Bharat Train : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी वंदे भारत आतापर्यंतची सर्वात महाग ट्रेन; तिकीट किती असणार?
10 फेब्रुवारीपासून मुंबईत दोन नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहेत. त्यात मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे तिकिटांची किंमत इतर सर्व गाड्यांपेक्षा सर्वात महाग असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईहून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचं हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील. दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल. दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.
दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल. दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.
वंदे भारत एक्स्प्रेस हा पुण्याला जाण्यासाठी सर्वात जलद रेल्वे प्रवास ठरेल. मुंबई ते पुणे जाण्यासाठी फक्त तीन तास लागेल.
प्रवाशांना साईनगर शिर्डीला पोहोचण्यासाठी 6 तास आणि सोलापूरला पोहोचण्यासाठी 5 तास 30 मिनिटे लागतील. नाशिकसाठी CC भाडे 550 रुपये आणि (EC) एक्जीक्यूटिव चेयर कारसाठी 1,150 रुपये असतील.
साईनगर-शिर्डीसाठी 800 रुपये आणि चेयर कार ( CC) आणि EC साठी 1,630 रुपये दर अपेक्षित आहे. सोलापूरचे तिकीट भाडे CC आणि EC साठी अनुक्रमे 965 रुपये आणि 1970 रुपये असेल.
वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूर दरम्यान भोर घाटातून धावणार आहे आणि 6तास 35 मिनिटांत अंदाजे 455 किमी अंतर कापण्याची शक्यता आहे.
मुंबई-शिर्डी ट्रेन थळ घाटाlतून धावेल आणि 5 तास 25 मिनीटांत 340 किमी अंतर कापेल.